परभणी गंगाखेड महामार्ग आज रणांगण बनला, खळी पाटी येथे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता रस्ता रोको आंदोलन केले, अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झाले, पण मदत कुठे आहे असा तीव्र सवाल शेतकऱ्यांनी सरकारला केला. 100 टक्के नुकसान भरपाई द्या, पीक विमा तात्काळ द्या, जनावरांच्या मृत्यूची भरपाई वाढवा, चारा छावण्या सुरू करा, तीन हेक्टरची मर्यादा रद्द करा अश्या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या.