रायगडच्या माणगाव तालुक्यातील देवळी गावात जमीन खचल्याने दोन घरांचे नुकसान झाले. डोंगराच्या पायथ्याशीअसलेल्या आत्माराम भोजने यांच्या घराचा पुढील भाग खचल्याने तो भाग समोर असलेल्या सुरेश भोजने यांच्या घरावर कोसळला.यात भोजने यांच्या घराचे मोठे नुकसान झालं.सुरेश भोजने यांच्या घरातील स्वयंपाकाची खोली जमीनदोस्त झाली. घराचा मागील बाजू जमीनदोस्त झाली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेनंतर घरातील विराजमान बाप्पांची मूर्ती उचलून बाहेर आणावी लागली.