झेंडूच्या फुलांच्या बाजारभावात अचानक झालेल्या घसरणीमुळे कुंभोज व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. उत्पादन खर्चही वसूल न झाल्याने अनेकांनी काढलेली फुले थेट नदीत टाकून आपला संताप व्यक्त केला.शेतीसाठी लागणारी बियाणं,खते, कीटकनाशके,मजुरी व वाहतूक यावर प्रचंड खर्च होतो.मात्र यंदा झेंडूला केवळ ५-६ रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही. प्रतिकिलो उत्पादन खर्च १५-२० रुपये असल्याची माहिती शेतकरी अभिजीत पाटील यांनी दिली.