महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे उभारण्यात येणाऱ्या १४ अत्याधुनिक कॅथ लॅबपैकी पहिली लॅब धुळे जिल्हा रुग्णालयात सुरू होत आहे. तिचे लोकार्पण १३ सप्टेंबर रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला आमदार, खासदार व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याआधी शिंदे गट नेते तुळशीराम गावित व मनोज मोरे यांनी स्थळ पाहणी करून सूचना दिल्या. सर्व तयारी दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती डॉ. दत्ता देवगावकर यांनी दिली.