नायगाव शहरातील जिजाऊ चौक येथे व्हाईट हाऊस समोर दि ६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास यातील फिर्यादी चव्हाण यास यातील आरोपी १) रवि देवकांबळे २) संदीप देवकांबळे ३) चंद्रकांत भालेराव यांना फिर्यादीने उशीर होत आहे असे म्हणाले असता तसे का म्हणाला म्हणून छातीत मारून गंभीर जखमी करून खुन करण्याचा प्रयत्न केला व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी पांडुरंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झालेला असून दोन आरोपी अटक केली आहे.