केज तालुक्यातील वरपगाव येथील सतीश ज्ञानोबा देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. देशमुख हे आपल्या मित्रासह मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईकडे निघाले होते. गुरुवार, 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 च्या दरम्यान नारायणगाव, पुणे येथे त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.सतीश देशमुख यांच्या निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. यापूर्वी तीन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचाही विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता.दरम्यान, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांग