रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर झाला असून जिल्ह्यातील नऊ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यंदा २७ प्रस्तावांपैकी ही निवड झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी दिली. गणेशोत्सवानंतर लवकरच एका विशेष समारंभात या शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे.