सेनगांव तालुक्यातील गोरेगांव या ठिकाणी आज डॉ बाबासाहेब गोपले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच बाबासाहेब गोपले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला असून याप्रसंगी बाबासाहेब गोपले सेना जिल्हाध्यक्ष तथा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्राप्त वसंतराव गायकवाड,सोपानराव रणबावळे,बबन वैरागड,भास्कर वैरागड,पार्वती खिल्लारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 1वाजता अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.