शहरात अमली पदार्थांचा विळखा वाढतच चाललाय. गांजा, अफीम, MD Drugs च्या विळख्यात तरुणाई अडकली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे टिळक चौकात सापळा रचण्यात आला. बुधवारी रात्री एम डी ड्रग्ज ची देवाणघेवाण करणारे दोन तरुण अलगद जाळ्यात अडकले. यावेळी 3.37 ग्राम एमडी पावडर सह 3 लाख 24 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला