अनेक महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यामध्ये बांगलादेशीनां ताब्यात घेऊन परत पाठवण्याची कारवाई हाती घेण्यात आलेली आहे. परंतु काही बांगलादेशी पुन्हा भारतात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही महिन्यापूर्वी बांगलादेशात पाठवलेली एक घुसखोर बांगलादेशी महिला पुन्हा भारतात सहा जणांना घेऊन परतल्या आणि कल्याणच्या रेल्वे स्टेशन परिसरात राहत होती. बेकायदेशीर रित्या राहत असलेल्या सहा महिलांनी एका बांगलादेशी पुरुषाला महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.