प्रेम संबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसापासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या शोधादरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी, जो खंडाळा येथे रहिवासी आहे. त्याला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.