शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भर पावसात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि गणरायाची आरती करून विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ झाला मनाचा गणपती नाशिक महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची विधिवत पूजा करून भक्ती चरणदास महाराज यांच्या समवेत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व इतर अधिकारी उपस्थित होते.