जालना ते अंबड रोडवरील काजळा फाटा परिसरात सतिश उर्फ लाला जैस्वाल याच्या मालकीचा आणि राजू दिलीप पैठणे यांच्या शेतात जालना येथील अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने छापा मारुन सुमारे 23 लाख 58 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला असून त्यांच्यावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी माहिती गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय. गुटखा माफीया सतिश उर्फ लाला जैस्वाल रा. जालना याने त्याच्या मालकीचा असलेला गुटखा पकडण्यात आला.