लातूर -लातूर जिल्ह्यातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीतील शेळगाव शिवारात काही दिवसांपूर्वी अज्ञाताचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून टाकण्यात आला होता. या खुनाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.लातूर पोलिसांनी काटेकोर तपास करत अखेर या गुन्ह्याचा छडा लावला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कौशल्यपूर्ण कामगिरी बजावत गूढप्रकरण उघडकीस आणले.