गणरायाच्या आगमनाची चाहूल लागल्यापासूनच राज्यभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) विशेष व्यवस्था केली असून बीड विभागातून तब्बल 245 विशेष बसेस कोकणाकडे रवाना करण्यात आल्या आहेत. बीडसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून गणेशभक्त आपल्या कुटुंबासह कोकणातील गावी जाण्यासाठी उत्सुक आहेत.