भाजप सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा 2024 हा संपूर्णपणे लोकशाही व संविधानाच्या विरोधातला कायदा असून, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. या कायद्यानुसार शासनाला मनमानी अधिकार मिळत असून, कुठल्याही व्यक्तीला कारणाशिवाय अटक करणे, विरोधी आवाज दडपणे आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे शक्य होणार आहे. असा हा कायदा रद्द करावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी केली आहे.