ठाणे शहराच्या मानपाडा परिसरातील निळकंठ ग्रीन या सोसायटीची सुमारे दीडशे फूट लांब आणि वीस फूट उंचीची संरक्षण भिंत कोसळली.ही संरक्षण भिंत पाच ते सहा झाडांवर आणि नाल्यांवर पडली. सुदैवाने आजूबाजूला कोणीही नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये संरक्षण भिंतीचे आणि झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.