डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा होत आहे. अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड वसतिगृहात विद्यार्थ्यांनी प्रगत शेती तंत्रज्ञानाचे देखावे साकारले. “शेतीच्या सर्व प्रक्रिया” या थीमनुसार जमीन तयार करणे, लागवड, सिंचन, कापणी ते बाजारपेठेपर्यंतच्या टप्प्यांचे प्रदर्शन झाले. ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, मायक्रो इरिगेशन तसेच इस्रो-नासाचा निसार सॅटेलाइट विशेष आकर्षण ठरले. गणेशमूर