शहराच्या मध्यभागी असलेल्या अंबादेवी देवस्थानात अष्टमीनिमित्त आज दि. 30 सप्टेंबरला सकाळी 6 वाजता पासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली. यावेळी मंदिरात पुरुष व महिलांनी टाळ मृदंगाच्या गजरात अंबादेवीचा जयघोष केला. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजता आरती करून परत दर्शनासाठी भाविकांनी रीघ लावली.