दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील शरद पवार गटाचे माजी नगरसेवक आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या अमित सरय्या यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खंदया समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जात आहे. आम्ही आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत अशा आशयाचे बॅनर नितीन सिग्नल येथे देखील लावले असून हे बॅनर येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.