दिनांक 01/09/2025 रोजी अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी नेमण्यात आलेले पथक सोनई पो.ठाणे हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढत असतांना, पथकास सोनई-नेवासा रोड लगत, अमळनेर गांवाच्या शिवारात, जोरे वस्ती येथे एक इसम महाराष्ट्रात राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला मावा, सुंगधी तबाखू चोरुन विक्री करत असल्याची गोपनिय बातमी कळाली असता, बातमीची खात्रीकरुन, पोनि किरणकुमार कबाडी यांना माहिती देवुन, त्यांचे आदेश व मार्गदर्शनाने छाप्याचे नियोजन केले. मिळालेल्या गोपनिय बातमीच्या ठिकाणी छापा टाकला.