फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याने एका विशेष मोहिमेअंतर्गत, सन २०२५ मध्ये गहाळ झालेले तब्बल १२ लाख ७० हजार रुपये किमतीचे ७४ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर कर्नाटक, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यांमधूनही या मोबाईलचा शोध घेण्यात आला असून, पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून सोमवारी दुपारी तीन वाजता देण्यात आलेल्या माहितीनुसार मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.