२३ वर्षीय तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी समाधान श्रीपती कसबे या तरुणाविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांचे दुकान असल्याने ती दुकानात बसत असे. आरोपी दुकानात खरेदीच्या बहाण्याने येऊन तिच्याशी बोलू लागला. "माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करूया," असे सांगून तिला मोबाईल देऊन संपर्क साधला.