या प्रकरणात पोलीसांनी सराईत गुन्हेगार बाबा गॅंग सक्रिय सदस्य असलेल्या पवन देवेंद्र बनेटी (वय-२४ वर्षे, रा- राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, सांगवी, पुणे) याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं आहे. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे ही पोलिसांनी जप्त केली आहेत पवन हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत.