नाशिकरोड विभागीय मनपा कार्यालयाच्या वतीने अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली.मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत टाकलेल्या टपऱ्या आज काढण्यात आले.नाशिकरोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर, नाशिक पुणे महामार्गावर आय एस पी प्रेसच्या भिंतीला लागून अनेक अनधिकृत टपऱ्या लावण्यात आल्या होत्या. महामार्गावर बिटको आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे रहदारीला नेहमीच अडथळा निर्माण होतो तसेच लहान मोठ्या अपघात घडत असतात.