पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा म्हणून पोलीस यंत्रणा अर्लट झाली असून या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क असल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक जळगाव यांनी दिलेल्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाणे रूट मार्च चे आयोजन आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले होते.