मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव मावली हळणवर यांनी दिली आहे. आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, त्यांनी मराठा समाजाला इशारा देखील दिला आहे.