जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. तक्रारीवरून लावलेल्या सापळ्यात जिल्हा परिषदेमधील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई शुक्रवार ४ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा परिषद परिसरात खळबळ उडाली आहे.