ओबीसी नेत्यांच्या बैठकीत बोलावले नसल्यामुळे लक्ष्मण हाके आरोपांची सरबत्ती करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. हाके यांनी केलेले आरोप निराधार असून त्यांच्या नाराजीमुळेच अशी विधाने केली जात असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले.यावेळी खोचक शब्दांत प्रत्युत्तर देताना मिटकरी म्हणाले, “हाके जेवताना चटणी-भाकर खातात की काय हे पहावे लागणार आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.