आज सोमवार दि १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वा चार वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह समोर सकल मराठा समाजाच्या वतीने महायुतीतील मराठा खासदार आमदार यांचे फोटो लावलेले बॅनर लाऊन आपण यांना पाहिलेत का म्हणत अनोखे आंदोलन केले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल यांनी मुंबई आझाद मैदान येथे आमरण ऊपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असतांना देखील नांदेड शहर तथा जिल्ह्यातील महायुतीतील मराठा खासदार आमदार यांनी त्यांची भेट घे