धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने दूधगंगा धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली आहे.आज शुक्रवार, दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता केवळ 6 हजार क्यूसेस विसर्ग सुरू आहे.पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील जलसाठा सध्या नियंत्रित पातळीवर आहे.सध्या धरण परिसरात आणि कर्नाटक भागातही पावसाचा जोर कमी असल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.