दरवर्षी हंगामाच्या तोंडावर आंदोलन होऊन कारखाने उशिरा सुरू होतात आणि शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर तुटत नाही, याकडे लक्ष वेधत यावर्षी आम्ही आंदोलन करणार नाही,पण कारखान्यांनीच सप्टेंबर अखेरपर्यंत ऊस दरावर तोडगा काढावा,अशी स्पष्ट भूमिका आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी मांडली.संघटनेच्या शेतकरी वजन काटा कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील गुरुजी होते.बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.