तहसील कार्यालयात तहसीलदार दालनाचे उद्घाटन आमदारांच्या हस्ते आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले, पाचोरा तहसीलदारांनी नव्या दालनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. पाचोरा तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतातून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले.