जिल्ह्यातील सर्व आदिवासी गावांचा आराखडा तयार होणार आहे. जेणेकरून सन 2047 च्या विकसीत भारताच्या संकल्पनेत त्याचा समावेश करता येईल. त्यामुळे लोकसहभागातून आपल्या जिल्ह्याचे उत्कृष्ट ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करा, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने वन अकादमी येथे आज दि 8 सप्टेंबर ला 12 वाजता आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते.