पिंपळे गुरव परिसरातील मोरया पार्कमधील एका इमारतीतील घराला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र येथून दोन गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.घटनास्थळी पोहोचल्यावर पाहणीअंती विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घरातील मीटर बॉक्सला आग लागल्याचे स्पष्ट झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अल्पावधीतच आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवून ती विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.