गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपामुळे ग्रामीण भागात अनेक प्राथमिक उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियमित सेवेत समायोजन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ज्यामुळे रुग्णांना आरोग्यसेवा मिळण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. कर्मचारी नसल्यामुळे ग्रामीण भागातून रुग्णांना मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात येत आहे.