अतिवृष्टीमुळे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आकाश पुंडकर यांनी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत मोठी उमरीसह विविध भागांची पाहणी आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष जयंत मसणे, प्रभाग अध्यक्ष संदीप गावंडे यांनी केली. पाहणीवेळी एसडीओ, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवक व