डोंबिवलीच्या महारेरा घोटाळ्यातील 65 अनधिकृत इमारतींना महानगरपालिकेने तोडक कारवाई करण्याच्या नोटिसा पुन्हा पाठवल्या आहेत. पावसाळ्याच्या आणि सणासुदीच्या काळामध्ये नोटीसा पाठवल्यामुळे रहिवाशी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत. आयुष्यभर कमावलेल्या पैशातून घेतलेले हक्काचे घर जात असल्यामुळे हतबल झालेल्या रहिवाशांनी वेगवेगळे आशयाचे फलक हातात घेऊन, पेट्रोलच्या बाटल्या हातात घेऊन आत्मदहनाचा इशारा दिला आहे.