दारूच्या नशेमध्ये कोयत्याने वार करून मुलानेच आपल्या जनदात्या आईचा खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव सोरफ- सुतारवाडी येथे बुधवारी रात्री घडली. या घटनेत प्रभावती रामचंद्र सोरफ (वय ८०) या जागीच मृत झाल्या. याबाबत कणकवली पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मुलगा रवींद्र रामचंद्र सोरफ (वय ४५) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलीस ठाण्यात आज गुरुवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्या पासून सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.