शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ च्या दरम्यान कंझरा ते आरखेड शेतशिवारात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने कमळगंगा नदीला अचानक आलेल्या पुरात शेतातील कामे आटोपून कंझरा येथे परत येताना मजूर महिला रेखा रमेश मते व साक्षी रमेश मते पुरात वाहून गेल्या मात्र मुलीने काटेरी झुडपाला पकडल्याने थोडक्यात बचावली असून घटनास्थळावर आमदार हरीष पिंपळे,उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे,ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुठ्ठे, वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बजाव पथक यांनी धाव घेत शोध मोहीम सुरू केली