राज्य सरकारच्या महत्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला कर्जत तालुक्यात शुभारंभ झाला आहे.या अभियान कर्जत तालुक्यात यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्य सुरू झाले असून जिल्ह्यात क्रमांक एक वर कर्जत पंचायत समिती राहील असा विश्वास गटविकास अधिकारी आणि प्रशासक सुशांत पाटील यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा कर्जत पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती.