हिंगोली शहरातील गणेश भक्तांसाठी नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम जलकुंभांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असून, नागरिकांनी व भाविकांनी आपल्या घरातील श्री गणपती बाप्पाच्या मूर्ती या कृत्रिम जलकुंभातच विसर्जित कराव्यात, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे