शेतातील कामे आटोपून घरी येत असलेल्या दापोरी येथील महिलेचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना, दिनांक 24 ऑगस्ट रोजी 12 ते एक वाजताच्या दरम्यान घडली आहे. पुष्पाताई अशोकराव डबराशे वय 50 वर्षे राहणार दापोरी अशेमृत्यू पावलेल्या महिलेचे नाव असून, गावातील रस्त्यावरील खड्डा वाचविताना दुचाकीचे संतुलन बिघडून त्या खाली पडल्या असल्याने, त्यांना तात्काळ मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. मोर्शी पोलिसांनी मर्ग नोंद केली आहे