आज दिनांक आठ सप्टेंबर सकाळी आठ वाजता गंगापूर-वैजापूर महामार्गावर वरखेड पाटी येथे हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओने मोटारसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने, एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि एका वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वाळुंज बुद्रुक येथील सजन राजू राजपूत, वय २८, त्यांची पत्नी शितल राजू, वय २२, आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा कृष्ण अंश यांचा समावेश आहे.