सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 60 पैकी 29 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. गुरुवारी ऑरेंज अलर्ट होता तर पावसाचा जोर कायम राहण्याची लक्षात घेऊन शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी 'येलो अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे. लातूर जिल्ह्यातील मोठे प्रकल्प 100% भरले आहेत, तर पुलावरून पाणी वाहू लागल्याने 49 रस्त्यावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.