अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र मगर यांनी आपल्या निवासस्थानी महालक्ष्मीची स्थापना केली आहे.यावेळी त्यांनी ज्येष्ठा गौरी समोर ग्रामीण भागाचे दर्शन घडविणारा देखावा सादर केला आहे.या देखाव्यात ग्रामीण महिलांचे दैनंदिन कामकाज — पाणी भरणे, शेतीतील मदत, घरगुती कामे अशा विविध चलित दृश्यांद्वारे मांडण्यात आले आहेत. पारंपरिक ग्रामीण जीवनशैलीचे प्रतिबिंब असलेल्या या देखाव्यामुळे पाहणाऱ्यांना खऱ्या ग्रामीण संस्कृतीची अनुभूती मि