औसा -औसा तालुक्यातील भादा गावातील अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता एक भव्य ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, युवक, महिला, व शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. गावातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिर परिसर, शाळा, तसेच रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली.