बीड तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर लाकडी मशिन कार्यरत असून, अनेक ठिकाणी हे मशिन नियमबाह्य पद्धतीने चालवले जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिरस पारगाव शिवारातील "अमन सोमिल" या लाकडी मशिनवर विविध नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप करत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रावण मधुकर शिरसट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.