कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल जाधव यांचे निलंबन करण्यात आले आहे. मंत्री नितेश राणेंनी कणकवलीतील मटका अड्ड्यावर काल छापा टाकल्यानंतर आज शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा ७.४५ वाजता ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.