समुद्रपूर:शहरातील गणराया नगरीत वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कारवाई करीत १ लाख २८ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. प्राप्त माहितीनुसार ९ सप्टेंबर रात्री सुमारास वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुन्हे माहितीच्या आधारे समुद्रपूर शहरातील गणराया नगरीतील घरी रेड केला असता याठिकाणी १ किलो ३७ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ आढळून आले.यावेळी दोघांना अटक करण्यात आली आहे.